Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, धार्मिक श्रद्धा व सामाजिक शांतता या दोन्ही गोष्टी प्रशासनासाठी समान, संदीप पाटील - विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर (Police administration is ready to maintain peace and order in the backdrop of Ganeshotsav and Eid, both religious faith and social peace are equal for the administration, Sandeep Patil - Special Inspector General of Police, Nagpur Range, Nagpur)

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, धार्मिक श्रद्धा व सामाजिक शांतता या दोन्ही गोष्टी प्रशासनासाठी समान, संदीप पाटील - विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर (Police administration is ready to maintain peace and order in the backdrop of Ganeshotsav and Eid, both religious faith and social peace are equal for the administration, Sandeep Patil - Special Inspector General of Police, Nagpur Range, Nagpur)

चंद्रपूर :- श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी आज दुपारी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे महत्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर हे होते. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सोशल हार्मनी नावाने व्हॉट्सअँप गट तयार करण्यात आला आहे. या गटात जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक, शांतता समिती सदस्य आणि मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. सदर गटातील सदस्य, पत्रकार तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ही आढावा बैठक घेण्यात आली. 
             उत्सवादरम्यान कायद्याचे पालन न करणाऱ्या युवकांना गुन्हेगारीमुळे भविष्यावर होणारे दुष्परिणाम समजावून देत जबाबदारीने उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होणार असून, मिरवणुकीदरम्यान धोकादायक लेझर लाइट्सचा वापर करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले की, श्री गणेश उत्सव हा श्रद्धा, आनंद आणि ऐक्याचा उत्सव असला तरी त्या काळात कायदा व सुव्यवस्थेची कसोटी लागते. तरुणाईच्या गर्दीतील उन्मादावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला लोकसहभागाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. बैठकीत गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग सुरक्षित राहावा, धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाला बाधा येऊ नये यावर भर देण्यात आला. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हंटले की कायद्याचे उल्लंघन करणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. धार्मिक श्रद्धा व सामाजिक शांतता या दोन्ही गोष्टी प्रशासनासाठी समान महत्वाच्या आहेत. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक दृष्ट्या प्रगतीशील होत असून, जिल्ह्याची ओळख शांतताप्रिय जिल्हा म्हणून कायम ठेवण्याची जबाबदारी नागरिक, पत्रकार व प्रशासन सर्वांची आहे. 
           पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शांतता व शिस्त राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. पोलीस यंत्रणा ही केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था नसून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारा घटक आहे. कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले, तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. भक्ती, श्रद्धा, आनंद व उत्साहासोबत जबाबदारीची जाणीव ठेवली, तर चंद्रपूर जिल्हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून प्रचिती कायम ठेवून शिस्तबद्धतेचा आदर्श निर्माण करू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीस पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, चिमूरचे उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे, ब्रम्हपुरीचे राकेश जाधव, वरोऱ्याचे संतोष बाकल, गडचांदुरचे रविंद्र जाधव, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा प्रमुख, सोशल हार्मनी गटाचे सदस्य, जिल्हा शांतता समिती सदस्य, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या