बल्लारपूर :- जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधत बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशनतर्फे यंदा हा दिवस एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. छायाचित्रकार दिनानिमित्त केवळ कार्यक्रमापुरता उत्सव न मानता समाजासाठी उपयोगी ठरणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा असोसिएशनने जपली असून, यंदा शहरातील रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एम्बुलेंस चालक व एम्बुलेंस डॉक्टरांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम शहराच्या नगर पालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील सर्वच फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एम्बुलेंस चालकांचे योगदान अधोरेखित एम्बुलेंस चालक हे रुग्णवाहिकेतील ‘अनामिक हिरो’ असून ते २४ तास रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज असतात. अपघात असो की आकस्मिक आजार, त्यांना कोणतीही वेळ, हवामान किंवा परिस्थिती थांबवू शकत नाही. त्यांच्या तत्परतेमुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले आहेत. म्हणूनच त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
असोसिएशनची परंपरा कायम बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशन दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करत आली आहे. छायाचित्रण या कलाक्षेत्राबरोबरच समाजाशी निगडीत जबाबदारी पार पाडण्याचे उदाहरण असोसिएशनने या उपक्रमाद्वारे दाखवून दिले आहे. याच बरोबर शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्री सतीश गडकर आणि श्री प्रेमचंद चौधरी यांचा शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे एम्बुलेंस चालकांच्या कार्याला मिळालेले प्रोत्साहन आणि छायाचित्रकारांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी हे दोन्ही पैलू नागरिकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील. याप्रसंगी अध्यक्ष संजय वानखेडे, उपाध्यक्ष निलेश घुमे, सचिव विवेक गडकर,सहाचिव राहुल कडुकर, कोषाध्यक्ष प्रेमचंद चौधरी, सदस्य श्रीकांत येनुरकर, दिनेश लीचोडे, दिलीप नाईक, स्नेहदिप सोगे, मिलिंद दारुंडे, राजेश सिंग, संजय बोरकर, शर्मन अहिरवार, प्रवीण साठे, नवनीत गोंगले, गुंजन वानखेडे, राज स्टुडिओ, विकास राजूरकर, अनिल रामटेके, रुपेश सिंग, इत्यादी सर्व छायाचित्रकार उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या