महात्मा फुले महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय द्वारे फ्रेशर्स पार्टीचं आयोजन करून केल नवागताच स्वागत (Mahatma Phule College Junior College welcomes newcomers by organizing a freshers' party)
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर संचालित महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम कनिष्ठ महाविद्यालय, वाणिज्य विभागामार्फत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. बारावीच्या विद्यार्थिनी दिशा निशाद आणि आफरीन शेख यांनी संयोजन कौशल्य दाखवत कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रा. कृष्णा लाभे यांनी करताना नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचे महत्त्व पटवून दिले. स्वागतगीताने वातावरणात आनंद व उत्साहाची लहर निर्माण झाली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिवाकर मोहितकर, इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक प्रा. कृष्णा लाभे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश कर्णासे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी भूषवले. या प्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी शिवानी कुमारी हिने आपले मनोगत व्यक्त केले. सध्या नागपूर येथे कंपनी सेक्रेटरी कोर्स करत असलेल्या शिवानी हिने शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगत नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. फ्रेशर्स पार्टीच्या माध्यमातून जुन्या व नवीन विद्यार्थ्यांमध्ये ओळख वाढावी, संवाद आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा हा उद्देश साध्य करण्यात आला. अनेक नवीन विद्यार्थ्यांनी आपले विचार व भावना व्यक्त करत या संधीचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शिक्षक दिव्या वर्मा, आदिती गहेरवार, सोनाली कायरकर व पल्लवी खनके यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या