Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (Independence Day celebrated with enthusiasm at Mahatma Jyotiba Phule College)

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (Independence Day celebrated with enthusiasm at Mahatma Jyotiba Phule College)


बल्लारपूर :- भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाच्या ध्वजारोहन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या हस्ते पार पडले.


       यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, छोटुभाऊ बोरीकर, अंकितभाऊ कायरकर, अजयभाऊ कायरकर, प्रा. गुलाब कायरकर यांच्यासह बल्लारपूर स्पोर्ट असोसिएशनचे सदस्य यांची उपस्थिती होती. 


         तदनंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन, एनसीसी गीत गायन करण्यात आले यानंतर 21 महाराष्ट्र बटालियन युनिट महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या 108 कॅडट नी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली      


            यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. शुभांगी भेंडे तर आभार प्रदर्शन प्रा. ले. योगेश टेकाडे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम. प्रा. सोनोने, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम, अशोक गर्गेलवार, सिद्धांत मोरे, श्यामभाऊ दरेकर, अश्विनीताई, यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.



संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या