बल्लारपूर पोलीसांची कारवाई, अवैध देशी-विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला ६ लाख १४ लाखांचा मुद्देमालासह अटक (Ballarpur police take action, arrest accused of transporting illegal domestic and foreign liquor with seized goods worth Rs 6.14 lakh)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांनी अवैध देशी-विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला ला अटक केली असून ६ लाख १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी वाहनचालक सुदर्शन शंकर दासारी (३८) वर्ष, रा. गडचांदुर यास अटक कण्यात आली. तपासात देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या २५ पेट्या किंमत १ लाख रुपये आणि विदेशी दारू ऑफीसर चॉईस कंपनीच्या २ पेट्या किंमत १४ हजार रुपये असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरण्यात आलेली बलीनो कार किंमत ५ लाख रुपये जप्त करण्यात आली. अशा एकूण ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१६ ऑगस्ट २०२५ रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत डायल ११२ वाहनावरील मार्शल पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे बामणी टी-पॉईंट, कोठारी रोड येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाची बलीनो कार क्रं एम.एच. ३४-सीजे-२४७७ संशयास्पदरीत्या येताना दिसली. वाहनास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोहवा. परमीवीर यादव, पोअं. सौरभ मुन व इतर कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. या कारवाईत वाहनचालक सुदर्शन शंकर दासारी (३८) वर्ष, रा. गडचांदुर यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संपादक -: दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या