Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर नगर परिषदेची संभाव्य प्रभाग रचना जाहीर, 31 ऑगस्ट पर्यत आक्षेप व हरकती नोंदविण्याचे आवाहन (Prospective ward structure of Ballarpur Municipal Council announced, appeal to register objections and suggestions by August 31)

बल्लारपूर :- बऱ्याच कालावधी पासून बहुप्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर असतांना निवडणूक आयोगाने बल्लारपूर नगर परिषदेची संभाव्य प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार आता बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात 16 ऐवजी 17 प्रभाग राहणार आहेत तसेच नगरसेवकांची संख्या ही 32 वरून 34 वर जाणार आहे यामुळे राजकीय पक्षासोबतच अनेक कार्यकर्त्यांचं याकडे लक्ष लागलेले आहे. विशेष बाब म्हणजे निवडणूक आयोगाने 18 ऑगस्टला प्रभाग रचना जाहीर करतांना सूत्रांच्या माहितीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत आक्षेप व हरकती नोंदविण्याचं आवाहन केले आहे त्यावर पुढील 8 दिवसात निर्णय घेण्यात येईल व 9 ते 11 सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांच्या अवलोकणासाठी नगर परिषदेची संभाव्य प्रभाग रचना नगर परिषद येथील सूचना फलकावर प्रदर्शीत करण्यात आली असून नागरिक व राजकीय पक्षानी याआधारे आक्षेप व हरकती नोंदविण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या