बल्लारपूरात उद्या 15 ऑगस्टला महाकवी वामनदादा कर्डक जयंती समारोहाचे आंबेडकरी युथ च्या वतीने आयोजन (Ambedkar Youth to organize Mahakavi Vamandada Kardak Jayanti celebrations in Ballarpur tomorrow, August 15)
बल्लारपूर :- महाकवी वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. महात्मा बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासत, ‘संपूर्ण भारत बौद्धमय’ करण्याच्या बाबासाहेबांच्या स्वप्नांना कवितेची पंख दिली. समता, स्वतंत्रता आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांचा लढा अखेरपर्यंत सुरू राहिला. आंबेडकरी युथ बल्लारपूरतर्फे १५ ऑगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनासोबतच या क्रांतिकारी लोककवीच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट रोजी सायं.६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, आम्रपाली चौक, सिद्धार्थ वार्ड, बल्लारपूर येथे जयंती सोहळ्याचे उद्घाटन होईल. सायं. ६.३० वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सूत्रसंचालन नरेंद्र सोनारकर करतील. या संमेलनात ऍड. योगिता रायपूरे (चंद्रपूर), संगीता बांबोडे (गोंडपिपरी), प्रणित झाडे (राजुरा), सिमा भसारकार (चंद्रपूर), प्रीती वेलेकर (चंद्रपूर), विश्वास देशभ्रतार (बल्लारपूर) आणि अरुण लोखंडे (बल्लारपूर) सहभागी होतील. सायं. ७.३० वाजता आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येईल, तर रात्री ८ वाजता वामनदादांच्या क्रांतिकारी गीतांनी कार्यक्रमाचा समारोप होईल. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी युथ चे ऍड. प्रियंका चव्हाण, दीक्षा चव्हाण, कशीश वेले, शुभम चिकाटे, संकुल झाडे, अमर धोंगडे, अजित पडवेकर, श्रेया वाळके, एकता भगत, प्रियंका दुपारे, बादल ताकसांडे, सुमित नगराळे सह आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

0 टिप्पण्या