बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे भारतीय गणराज्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. संजय कायरकर, अध्यक्ष म. रा. शि. म., मा. राजेश चिताडे, उपाध्यक्ष म. रा. शि. म., डॉ. बालमुकुंद कायरकर यांची उपस्थिती होती. प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, एनसीसी गीत गाण्यात आले. सोबतच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन प्रा. दिवाकर मोहितकर यांनी केले. यानंतर 21 महाराष्ट्र बटालियन वर्धा संलग्नित महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसी च्या 108 कॅडट द्वारे राष्ट्रध्वजा सह मान्यवर अतिथीना सलामी देऊन पथ संचलन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयाच्या विविध विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमात (क्रीडा विभाग, अर्थशास्त्र विभाग (कमवा व शिका), राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस) च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले तसेच ग्रंथालय विभागाच्या वाचन संकल्प अभियाना अंतर्गत काही विद्यार्थ्यांना पुरस्कार स्वरूपात ग्रंथ भेट देण्यात आले.
मागील वर्षभरात एनसीसी चे 10 कॅडट भारतीय सैन्याच्या विविध विभागात दाखल झाले त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन व नृत्य सादर केले यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. रजत मंडल म्हणाले की " भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना भारताने प्रगती साधली आहे एकीकडे भारतातील शेजारी राष्ट्रात अशांतता असून तेथील राजकीय परिस्थिती अशांत असताना भारतासारख्या विविधतेत एकता असणाऱ्या देशाला भारतीय संविधानाने एक सूत्रांत बांधून ठेवलं आहे व हेच भारतीय संविधानाचं यश आहे. व हे यश भारतीय घटनाकारांच्या अथक प्रयत्नातून घडलं आहे. " या कार्यक्रमाचे संचालन ले. प्रा. योगेश टेकाडे, व आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी भेंडे यांनी केले यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या