चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 1 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 लाभार्थी महाबोधी महाविहार (बुध्दगया जि. गया बिहार राज्य) तीर्थदर्शनकरीता पात्र करण्यात आले आहे. यानुसार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूरातून रेल्वे जाणार असून दि. 2 फेब्रुवारीला बुध्दगया येथे पोहोचणार आहे. तर दि. 3 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना बुध्दगयेतील महाबोधी महाविहाराचे तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार असून. 4 फेब्रुवारीला सदर रेल्वे बुध्दगया येथून परतणार असून 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. याप्रमाणे लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. तरी, लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या