सर्वोच्च न्यायालयाचा 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवीन ध्वज व चिन्हाचे अनावरण (Unveiling of new flag and emblem on the occasion of 75th anniversary of Supreme Court)

Vidyanshnewslive
By -
0
सर्वोच्च न्यायालयाचा 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवीन ध्वज व चिन्हाचे अनावरण (Unveiling of new flag and emblem on the occasion of 75th anniversary of Supreme Court)

वृत्तसेवा :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन ध्वजावर 'यतो धर्मस्ततो जयः' असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे, ज्याचा अर्थ 'जेथे धर्म आहे, तेथे विजय होईल.' ध्वजाच्या शीर्षस्थानी अशोक चक्र, मध्यभागी सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि तळाशी राज्यघटनेचे पुस्तक आहे. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सह अन्य न्यायाधीश ई ची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)