Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूरातील थरारक घटना ! महाकाली कॉलरी पुलावरून कार वाहू लागली, दोघांनी आपला जीव वाचवीला (Thrilling incident in Chandrapur! The car swerved from the Mahakali colliery bridge, both of them saved their lives)

चंद्रपूरातील थरारक घटना ! महाकाली कॉलरी पुलावरून कार वाहू लागली, दोघांनी आपला जीव वाचवीला (Thrilling incident in Chandrapur! The car swerved from the Mahakali colliery bridge, both of them saved their lives)


चंद्रपूर :- मागील पाच दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाल्यांचा प्रवाह वाढला आहे. छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी कडे जाणाऱ्या स्मशान घाट जवळील पुलावरून कार वाहून गेल्याची घटना आज उघडकीस आली. कारमधील लोक थोडक्यात वाचल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी झरपट नदी दुथडी भरून वाहत आहे. वेकोलि महाकाली कॉलरी कडे जाणाऱ्या स्मशान घाट जवळील झरपट नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. आज सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास एका कार चालकाने पाण्याच्या प्रवाहामुळे पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी उपस्थित लोकांकडून सांगण्यात येत आहे की, कारमध्ये दोन जण होते, त्यापैकी एकाने धोका पाहून खाली उतरले आणि दुसऱ्याने झाडाला लटकून आपला जीव वाचवला. सदर घटनेचे व्हिडिओ वायरल होत असून ज्यामध्ये कार पाण्यात वाहत आहे. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी पुलावरून वाहू लागली. वाहनातील दोघांनीही सतर्क राहून आपले प्राण वाचवले. मात्र कार पाण्याच्या प्रवाहात वाहत राहिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही  प्रशासन नेहमी नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन करते मात्र नागरिकांच्या दुर्लक्षामूळ अशा प्रसंगाना सामोरे जावे लागते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या