बल्लारपूरात दिवसाढवळ्या गोळीबार, बॉम्ब टाकून दुकान जाळण्याचे प्रयत्न, 1 जखमी (Daylight firing in Ballarpur, attempt to set fire to shop with bomb, 1 injured)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात दिवसाढवळ्या गोळीबार, बॉम्ब टाकून दुकान जाळण्याचे प्रयत्न, 1 जखमी (Daylight firing in Ballarpur, attempt to set fire to shop with bomb, 1 injured)


बल्लारपूर :- शहरात वस्ती विभागात एका दुकानात गोळीबारी व बॉम्ब टाकून जाळण्याचे प्रयत्न केल्याची घटना घडली असून गोळीबारात एक जण जखमी झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. गोळीबार झाल्याने वस्ती विभागात घबराट निर्माण झाली असून दुकानदारांनी आप आपले दुकान बंद करून आरोपींना पकडण्याची मागणी करत आहेत. वस्ती विभागातील मालू बंधूचे सर्वात जुनी मोतीलाल प्रभुलाल मालू कपड्याचे दुकान असून आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अभिषेक मालू यांनी दुकान उघडताच काही वेळाने अज्ञात तीन इसमांनी मोपेड वर येऊन ३ फेऱ्या गोळीबार करीत दोन बॉम्ब फेकून दुकान जाळण्याचे प्रयत्न केले. या गोळीबारात दुकानातील नोकर कार्तिक साखरकर (२५) यांचा पायाला गोळी लागली असून त्याला उपचार्थ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील महिन्यात सुद्धा तीन इसमांनी अभिषेक मालू याचावर हल्ला करण्याचे प्रयत्न केले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)