Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ (Farewell ceremony of NCC students at Mahatma Phule College)

महात्मा फुले महाविद्यालयात एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ (Farewell ceremony of NCC students at Mahatma Phule College)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने एनसीसी च्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. ले. योगेश टेकाडे यांची विचार मंचावर उपस्थिती होती.
         कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रा. ले. योगेश टेकाडे यांनी करतांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यानंतर प्रा. सतिश कर्णासे यांनी एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी आपले यश प्राप्त करून घेतांना महाविद्यालयासोबत कुटुंबियांच नाव रोशन करावं.
          अध्यक्षीय स्थानावरून आपल मनोगत व्यक्त करतांना डॉ. बादलशाह चव्हाण म्हणाले की एनसीसी हा महाविद्यालयाचा एक महत्वपूर्ण घटक असून या माध्यमातून अनेक विद्यार्थी देशसेवा करीत आहे या विद्यार्थ्यांनी एनसीसी सोबतच इतर विषयाच ज्ञान संपादन करून यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा तसेच पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला डॉ. विनय कवाडे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. किशोर चौरे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्या सोबत शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या