Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, 2023 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन (State Govt Excellence Journalism Award, Call for entries for 2023)

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, 2023 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन (State Govt Excellence Journalism Award, Call for entries for 2023)
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 असा आहे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.
            राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये 01 राष्ट्रीयस्तरीय 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 20 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत पुरस्कारांची माहिती पुरस्काराचे नाव व पारितोषिक पूढील प्रमाणे 1.अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) 1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक) 2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 7. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 10. समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
           विभागीय पुरस्कार दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) 14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 15. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 16. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र) 20.ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) देण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या