Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

ब्रेकिंग न्युज ! राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची शिक्षेला स्थगिती, खासदारकी परत मिळण्याची शक्यता ! Breaking news ! Big relief of Supreme Court to Rahul Gandhi, suspension of punishment by Supreme Court, possibility of getting back MP !

वृत्तसेवा :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावप्रकरणात सुनावण्यात आलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने आज स्थिगिती दिली आहे. मोदी आडनावाप्रकरणी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मार्च 2023 मध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने 21 जुलै रोजी गुजरात सरकारसह संबंधित तक्रारदारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले. दरम्यान, आज कोर्टात यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली आहे. यामुळं राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा होत असल्याची चिन्ह दिसत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या