बल्लारशाह वनपरिक्षेत्र अंतर्गत कळमना परिसरात 4 वर्षीय वाघ मृतावस्थेत आढळून आला. (A 4-year-old tiger was found dead in Kalmana area under Ballarshah forest range.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारशाह वनपरिक्षेत्र अंतर्गत कळमना परिसरात 4 वर्षीय वाघ मृतावस्थेत आढळून आला. (A 4-year-old tiger was found dead in Kalmana area under Ballarshah forest range.) 

बल्लारपूर :- आज दिनांक 29/07/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता चे सुमारास बल्लारशाह परिक्षेत्रा अंतर्गत नियक्षेत्र कळमना कक्ष क्र. 572 मधील सामाजिक वनिकरण रोपवाटीका कळमना चे लगत कुकुडरांझी चे झुडपात एकवाघ असल्याचे माहीती मिळाली. त्या अनुषंगाणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदण पोडचेलवार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांना पाचारण करण्यात आले व त्यांचे समक्ष सदर परिसराची पाहणी केली. सदर झुडपात असलेला वाघ वन्यप्राणी मृत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली. सदर प्रकरण नियत क्षेत्र कळमना अंतर्गत वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08945/223613/2023 दिनांक 29/07/2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर वाघ वन्यप्राण्याचे सर्व अवयव शाबुत असुन वन्यप्राण्याचे अंदाजे वय 4 वर्ष असुन लिंग मादी आहे. प्रकरर्णी मोकापंचनामा नोंदवुन वन्यप्राण्याचे शवास ताब्यात घेण्यात आले व शविच्छेदनासाठी ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपुर येथे नेण्यात आले. वन्यप्राण्याचे मृत्युचे खरे कारण शवविच्छेदनानंतर सांगता येईल. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती श्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर व श्री. श्रीकांत पवार सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह करीत आहे. सदर तपासाकरीता श्री. भगीरथ पुरी, क्षेत्र सहाय्यक कळमना व वनरक्षक कळमना यांनी सहकार्य केले. अशी माहिती नरेश रा.भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह प्रा. यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)