Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

तळोधीत स्थानिक गुन्हेशाखेची बनावट सुगन्धित तंबाकूच्या कारखान्यावर धाड !, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

तळोधीत स्थानिक गुन्हेशाखेची बनावट सुगन्धित तंबाकूच्या कारखान्यावर धाड !, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त 

चंद्रपुर :- 02 जुनला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गुप्त सूत्राद्वारे माहिती मिळाली की, तळोधी-बाळापूर हद्दीत मौजा  वलनी येथे सचिन वैद्य यांच्या फॉर्म हाऊस मध्ये मजा, ईगल व हुक्का असे कम्पनीचे  सुगन्धित तंबाकू आणून ते एका मशीनच्या साहाय्याने भेसळ करून सिलबंद करून  मजा स्वरूपात भेसळयुक्त तंबाकू विक्री करीत असल्याची माहिती स्थागुशा मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने मा. अरविंद साळवे यांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी धाड टाकली असता  सदर ठिकाणी 25 ते 30 वयोगटातील मूल आढळून आली तसेच तंबाकू साहित्य पॅकिंग करण्याचे यंत्र, तंबाकू बारीक करण्याचे यंत्र, हुक्का,  ईगल व मजा सुगन्धित तंबाकू एकूण वजन 990 किलो 800 ग्राम, बनावट सुगन्धित तंबाकू बनविण्याकरिता वेगवेगळ्या मशिनरी, वजन काटा, सिलिंग मशीन, लेबल मशीन,   बारकोड मशीन, मिक्सर मशीन, लाकडी मशीन व इतर साहित्य, तसेच कच्चा माल व पक्क्या मालाची वाहतूक करण्याकरिता आरोपीने वापरलेली मारुती सुझुकी व्हिटारा ब्रिझा MH-06 BM-4172, तसेच 8 मोबाईल संच असा एकूण 25,71,550/- रू चा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला विशेष म्हणजे सदर घटनास्थळावरुन 8 आरोपीना अटक कऱण्यात आली असून आरोपींची नावे 1) सलमान अरिफभाई कामसनी वय-27 वर्ष, रा. आरमोरी जि. गडचिरोली, 2) सागर तेजराम सतीमेश्राम वय-23 रा. खण्डाला, जि. भंडारा, 3)रोहित माणिक धारणे, वय -22 रा. गोगाव, ब्रम्हपुरी, 4) वैभव प्रभाकर फरकाडे, वय-24 रा.ब्रम्हपुरी, 5) सागर संजय गझभिये, वय 24 रा. साकोली जि. भडारा, 6)वैभव भास्कर भोयर, वय - 22, आरमोरी जि. गडचिरोली, 7) मयूर सुरेश चोचरे, चोचरे, रा. साकोली, 8) खेमराज विलास चटारे, रा. आरमोरी जि. गडचिरोली,  या 8 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई अरविंद साळवे, पोलिस अधिक्षक चंद्रपुर, अतुल कुलकर्णी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांचे  मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, संदीप कापडे, अतुल कावळे, राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, सुरेंद्र खनके, गणेश मोहुर्ले, संतोष येलपूलवार, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, गणेश भोयर, प्रांजल झिलपे, दिपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, प्रमोद डंभारे, शेखर आसूटकर ई नी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या