भारतीय युथ टायगर्स संघटनेच्या वतीने 12 व्यक्ती बल्लारपूर भूषण पुरस्काराणे गौरवान्वित !
बल्लारपूर :- भारतीय युथ टायगर्स संघटनेच्यावतीने 12 सत्कार मूर्तींना बल्लारपूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिनांक 30/05/ 2022 ला विजय स्तंभ परिसर जय भिम चौक बल्लारपूर येथे भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने भव्य बल्लारपूर भूषण गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बल्लारपूर विधानसभा निर्वाचित क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार अध्यक्ष विधीमंडळ लोकलेखा समिती माजी वित्त नियोजन व वन मंत्री महाराष्ट्र राज्य असून कार्यक्रमाचे ऊद्घाटक माननीय चंदन सिंग चंदेल हे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर विजय कळसकर साहेब वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर. माननीय विनोद यादव माजी उपाध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर माननीय अरुण वाघमारे माजी नियोजन सभापती नगर परिषद बल्लारपूर माननीय काशी सिंग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बल्लारपूर. सत्कारमूर्ती म्हणून बल्लारपूर चे पहिले निरो सर्जन डॉक्टर प्रशिक वाघमारे, डॉक्टर मधुकर बावणे साहेब कोरोना योद्धा, डॉक्टर प्रसेनजीत लीहितकर कोरूना योद्धा, कुमारी पुजा निषाद प्रथम लोको पायलेट बल्लारपूर, कुमारी अंकिता नवघरे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, रुचीत निनावे उत्कृष्ट बालकलाकार, कुमारी मोना भुते ड्रेस डिझायनर, माननीय भाऊरावजी लोखंडे विदर्भातील प्रख्यात कव्वाल कवी व गायक, शेख नियाज अहमद मित्रत्वाचे प्रतीक, सौ सपना पाटील नारी शक्तीचे प्रतीक अनुराग लोखंडे उत्कृष्ट विद्यार्थी. कृष्णा दरक चारटंट अकाउंटंट. यांना आमदार सुधीर भाऊ यांच्या हस्ते बल्लारपूर भूषण गौरव घेऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये नागपूरच्या सुप्रसिद्ध कव्वाल आकाश राजा भारती यांनी आपल्या बहारदार कव्वालीच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची शोभा वाढविली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झांमरे व कार्यक्रमाचे संचालन एडो. पवन मेश्राम तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भास्कर डांगे यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता स्वामी रायबरम नगरसेवक बल्लारपूर नागेश रत्नपारखी देशपाल सौदागर गौतम रामटेके अमोल झांबरे रोहन जामगडे दीक्षांत झांमरे मिथुन निमसरकार हरमीत सिंग जबल जाफर भाई तथा संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या