"भारतीय संविधान,सन्मान, सुरक्षा,संवर्धन अभियानात सामिल व्हा"

Vidyanshnewslive
By -
0

"भारतीय संविधान,सन्मान, सुरक्षा,संवर्धन अभियानात सामिल व्हा"


बल्लारपूर :- सर्वसामान्य लोकांना भारतीय संविधान समजावुन सांगणे व त्यातुन मानवि जिवनातील सर्व लोकांना स्वाभिमानाने जगण्याचे "अधिकार" संविधान सभेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी विपरित स्थितीत भारतीय संविधानातुन मिळवुन दिल्याचे राष्ट्रव्यापी अभियानच्या कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले. मा.उमेश दुपारे सिध्दार्थ वार्ड, बल्लारपूर यांचे अंगणात दि.१५/३/२२ ला सायं.४.०० वा.मा.कविता मडावी,राज्य उपाध्यक्ष,बामसेफ,यांचे अध्यक्षते खाली सभा संपन्न झाली.मुख्य अतिथी म्हणुन मा.संघा साव रिटा.मुख्याध्यापिका, तर अतिथी एम.टी.साव सर,होते.मा.दिवाकर मडावी  यांनी भारतीय संविधान, सन्मान,सुरक्षा,संवर्धन (बिएस-फोर,BS-4) राष्ट्रव्यापी अभियानाची पर्श्वभुमी कथन केली.या प्रसंगी मा.महेंद्र सोरते यांच्या जागृती पर गिताने व माल्यर्पणाने सुरुवात झाली. मा.जि.के. उपरे, एम.एस. करमनकर,मा.अनुप गोटे इ.मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी मा.उषा दिनेश मडावी,अश्विनी लिंगमवार, कांताबाई लांडे,अरूणा मडावी, अर्चना लिंगमवार,लिला नगराळे, प्रतिक्षा मेश्राम,मंगला मेश्राम,पुनम भसारकर,शशिकला मून,ज्योत्स्ना वाघमारे,जया वनकर,रेणुका दुपारे,इ.कार्यक्रमाचे आयोजन मा.वनिता भसारकर,यांनी तर व्यवस्थापन मा.अमृता उमेश दुपारे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)