चंद्रपुरातील प्रमुख आंतरराज्य मार्गावरील दिशादर्शक फलकावर "दीक्षाभूमी" ची नोंद होईल? चंद्रपूरातील दिशादर्शक फलकांची दैनावस्था, दुरूस्ती कधी? (Will "Dikshabhumi" be included on the directional signboards along the major interstate highway in Chandrapur? Given the dilapidated state of the directional signboards in Chandrapur, when will they be repaired?)
चंद्रपूर -: चंद्रपूर हे औद्योगिक व ऐतिहासिक महत्त्वाचे शहर असल्याने दररोज हजारो नागरिक, पर्यटक आणि व्यापारी कामानिमित्त शहरात येत असतात. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेतात ज्यात प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, गोंडकालीन असलेले चंद्रपुरातील प्रवेशद्वार, चंद्रपूर जिल्ह्याचं वनवैभव तसेच वाघासाठी म्हणून प्रचलित असलेले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यटकासाठी खुणावतोय तसेच चंद्रपूर शहरात येणाऱ्या नवीन वाहनधारकांना आणि नागरिकांना विविध भागात जाणे सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या वतीने प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्गांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या महाकाली मंदिर, ताडोबा प्रकल्प, सैनिकी विद्यालय, बॉटनिकल गार्डन अशा अनेक वास्तूची दिशादर्शक फलकावर नोंद घेण्यात आली आहे.
मात्र 16 ऑक्टोबर 1956 या दिनी रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक बदल घडून आला त्या "दीक्षाभूमी" ची नोंद दिशादर्शक फलकावर होणे गरजेचे आहे. दाताळा रोड व ताडोबा रोड(तुकूम) वर दीक्षाभूमी ची दिशादर्शक फलकावर नोंद असली तरी आंतरराज्य महामार्ग असलेले नागपूर रोड(पडोली चौक), मूल रोड(एमईएल चौक), बल्लारशाह रोड (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर) या तिन्ही मार्गांवर दीक्षाभूमी सह चंद्रपुरातील ऐतिहासिक वैभवाची नोंद दिशादर्शक फलकावर असायला पाहिजे जेणेकरून बाहेर जिल्ह्यातून वा राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक स्थळाविषयीं माहिती होण्यास मदत होईल याकरिता शासनाने या विषयाची नोंद घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे यातील बहुतांश फलक आता तुटलेल्या आणि दयनीय अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने हे फलक उभारण्यात आले, तो मूळ उद्देशच निष्फळ ठरत आहे. शहरातील गिरनार चौक, बस स्थानक परिसर, प्रियदर्शिनी चौक, तसेच मूल रोड आणि नागपूर बायपास रस्त्यांवर लावण्यात आलेल्या अनेक फलकांवरील अक्षरे उडून गेली आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या