चंद्रपूर :- चंद्रपूर शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इरई धरणाची आज सहकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी सौ. वसुमना पंत, मनपा आयुक्त श्री. नरेश अकुनरी हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, उपलब्ध जलसंपत्ती आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र घाबरण्यासारखे काही नाही. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून चंद्रपूरकरांना दुष्काळाच्या काळातही नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना पाण्याची कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून योग्य उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट केले.
नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, हीच आमची प्राथमिकता! यावेळी मुख्य अभियंता, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन श्री. अनिल काथोये, उपविभागीय अधिकारी श्री. विशाल कुमार मेश्राम, उपायुक्त मनपा श्री. शेषराव टाले, तहसीलदार श्री. विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सलीम शेख, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभाग श्री. जलेश सिंग, कार्यकारी अभियंता श्री. महेश गवरी, शहर अभियंता मनपा श्री. रवींद्र हजारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. प्रकाश देवतळे, भाजपा महामंत्री श्री. नामदेव डाहुले, श्री. रविंद्र गुरनुले, श्री. मनोज पाल, गटनेते श्री. शेखर शेट्टी, नगरसेवक श्री. सुभाष कासनगोट्टूवार, श्री. जितेश कुळमेथे, सौ. आशा देशमुख, श्री. बलराम डोडानी, श्री. तुषार सोम, श्री. दशरथ ठाकूर, श्री. अमोल शेंडे, श्री. प्रलय म्हशाखेत्री, श्री. प्रवीण गिलबिले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या