Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

पाली बुद्ध विहारात वर्षावास समापन कार्यक्रम थाटात संपन्न (Concluding ceremony of the 'Varshavasa' (rains retreat) held with great pomp at the Pali Buddhist Vihara)

पाली बुद्ध विहारात वर्षावास समापन कार्यक्रम थाटात संपन्न (Concluding ceremony of the 'Varshavasa' (rains retreat) held with great pomp at the Pali Buddhist Vihara)


बल्लारपुर -: भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे बुधवार दिनांक 29/10/2026 ला वर्षावास समापन कार्यक्रम थाटात सम्पन्न झाला. याप्रसंगी पूज्य भंते धम्मसारथी (नागपुर) म्हणाले की, बाबासाहेबानी केलेली धम्मक्रांति यशस्वी करायची असेल तर बाराही महीने शील समाधि प्रज्ञेचा अभ्यास करुन इतराना धम्म जगण्याची प्रेरणा द्यावी तरच धम्म रूजेल आणि वाढ़ेल. ही जबाबदारी भिक्षुवर अवलम्बुन न राहता गृहस्थानी आपल्या खांद्यावर घ्यावी अशी बाबासाहेबांची मनीषा होती. यावेळी भंते राहुल आणि भंते राहुलबोधी मंचावर विराजमान होते. भिक्षु संघाचे आगमनार्थ पुष्प अर्पण करुन स्वागत करण्यात आले. नंतर भिक्षु संघाचे भोजन झाले. तदनन्तर धम्मदेसनेचा कार्यक्रम सम्पन्न झाला. सूत्रसंचालन धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले. प्रास्ताविक धम्ममित्र भास्कर भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनू खोबरागडे यांनी केले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी स्नेहभोजनाचा कार्यक्रम सम्पन्न झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या