Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन चोरीचे गुन्हे उघड : दुचाकीसह रोख रक्कम जप्त (Local Crime Branch action; two theft cases solved; cash and a two-wheeler seized.)

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन चोरीचे गुन्हे उघड : दुचाकीसह रोख रक्कम जप्त (Local Crime Branch action; two theft cases solved; cash and a two-wheeler seized.)

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल, रोख रक्कम तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड असा एकूण सुमारे ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पहिल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रतीक धनराज झाडे ३२ वर्ष रा. महाकाली वार्ड, चंद्रपूर यास वृंदावन नगर रेल्वे पुलाखालून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक मोटारसायकल व ५०० रुपये रोख जप्त करण्यात आले. चौकशीत पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथील कन्याका विद्यालय चोरी प्रकरण तसेच पोलीस ठाणे वरोरा हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील अप. क्र. ९०१/२०२६ मधील लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चोरी प्रकरणातील चोरीच्या रकमेपैकी ५०० रुपये आरोपीकडून जप्त करण्यात आले. 
          उर्वरित रक्कम खर्च झाल्याचे आरोपीने सांगितले. तसेच वरोरा पोलीस ठाण्यातील अप. क्र. ९४२/२०२६ मधील चोरीची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ एएन ८८४४ किंमत सुमारे ५० हजार रुपये जप्त करण्यात आली. चोरीसाठी वापरण्यात आलेला सुमारे एक फूट लांबीचा लोखंडी रॉडही पोलिसांनी ताब्यात घेतला. दुसऱ्या कारवाईत २१ सप्टेंबर रोजी गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभिलेखावरील आरोपी अतुल उर्फ मुजोर विकास राणा ३० वर्ष रा. शामनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर यास जुनोना रोडवरील हनुमान मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५०० रुपये रोख जप्त करण्यात आले. चौकशीत चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील अप. क्र. ९४२/२०२६ मधील रुग्णालयातील चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर उपविभागाच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या