Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

जिल्हाधिकाऱ्याकडून ॲक्ट्रोसिटी प्रकरणांचा आढावा (District Collector reviews Atrocities Act cases.)

जिल्हाधिकाऱ्याकडून ॲक्ट्रोसिटी प्रकरणांचा आढावा (District Collector reviews Atrocities Act cases.)

चंद्रपूर -: अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 व सुधारीत अधिनियम 2016 (ॲक्ट्रोसिटी) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्हे प्रकरणांचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी (दि.20) आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत ॲक्ट्रोसिटी अंतर्गत एकूण 8 गुन्ह्यांची नोंद झाली असून यात खुनाचा एक गुन्हा, बलात्कार सहा गुन्हे आणि गंभीर मारहाण / दुखापतीच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. सद्यस्थितीत आठही गुन्हे पोलिस तपासावर असून अनुसूचित जाती संदर्भात चार तर अनुसूचित जमाती संदर्भात चार गुन्हे आहेत. तसेच ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत 73 लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने 77 लक्ष 82 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहेत. यात 28 पिडीतांना पहिला हप्ता तर 45 पिडीतांना दुसरा / तिसरा हप्ता देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, बलात्कार, खुन, विनयभंग संदर्भातील पिडीतांना वेळेवर अर्थसहाय्य मिळण्यासाठी पोलिस विभागाने त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याची माहिती, प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.), चार्जशीटची प्रत त्वरीत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे द्यावी. जे पोलिस अधिकारी अधिकारी वेळेवर माहिती देणार नाही, अशांना जबाबदार धरून कार्यवाही करावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, पोलिस विभागाचे श्री. कांक्रेडवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या