Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६ : अंतिम सामन्यात डॉक्टर संघ विजेता तर पत्रकार संघ उपविजेता (Nagaradhyaksh Cup Tournament 2026: Doctors' Team Emerges Victorious in the Final Match; Journalists' Team Finishes as Runner-up.)

नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६ : अंतिम सामन्यात डॉक्टर संघ विजेता तर पत्रकार संघ उपविजेता (Nagaradhyaksh Cup Tournament 2026: Doctors' Team Emerges Victorious in the Final Match; Journalists' Team Finishes as Runner-up.)

बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषदेच्या माध्यमातून 9 मे ते 11 मे 2026 पर्यंत नगराध्यक्ष चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होत या अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. अत्यंत रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात डॉक्टर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकाविले, तर पत्रकार संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे डॉक्टर संघाने प्रथम फलदाजी करतांना 80 धावा केल्या तर पत्रकार संघाने निर्धारित षटकात 50 धावा केल्या अशा प्रकारे डॉक्टर संघाने 30 धावानी विजय मिळविला 
       अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या छोटू साठे याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ केल्याबद्दल विशाल तांड्रा याला मॅन ऑफ द सिरीज तसेच बेस्ट बॅट्समन पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सूरज कवाडे याला बेस्ट बॉलर पुरस्कार देण्यात आला, तर अजय रासेकर याने बेस्ट विकेटकीपर चा मान पटकाविला. स्पर्धेत शिस्तबद्ध आणि क्रीडाभाव जपणाऱ्या डॉक्टर संघाला ‘फेअर प्ले टीम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला नगराध्यक्ष अलका वाढई अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, नगरसेवक निरज झाडे, अविनाश मट्टा, प्रणित सातपुते, नगर सेविका ॲड मेघा भाले, शिल्पाताई चुट्टे, वैष्णवी जुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मंच संचालन शब्बीर अली, स्वच्छता निरीक्षक यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी मानले. स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या