Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, जुगार अड्ड्यावर धाड : चार जणासह ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Ballarpur Police Action: Raid on Gambling Den; Four Individuals and Property Worth ₹4,550 Seized)

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, जुगार अड्ड्यावर धाड : चार जणासह ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Ballarpur Police Action: Raid on Gambling Den; Four Individuals and Property Worth ₹4,550 Seized)

बल्लारपूर :- ग्रामीण रुग्णालय मागील शांतिनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारशाह पोलिसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १३ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली होती की, सरकारी दवाखान्यामागे रोहित गिरी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत काही इसम ५२ पत्त्यांवर हारजीतचा जुगार खेळत आहेत. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. 
          यावेळी आरोपी नामे रिझवान ईरफान सय्यद (वय २४), रा. बालाजी वार्ड बल्लारपूर अब्दुल रहुफ अब्दुल सत्तार (वय ६०), रा. संतोषी माता वार्ड, अजर अकबर सिद्दीकी (वय ४२), रा. रविंद्र नगर वार्ड आणि मोहम्मद रईस मोहम्मद युसूफ (वय २९), रा. बालाजी वार्ड, बल्लारपूर हे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या जवळून रोख रक्कम तसेच डावावर लावलेले पैसे आणि ५२ पत्त्यांचा संच असा एकूण ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, पोलीस अंमलदार शरद कारुष, खंडेराव माने व लखन चव्हाण यांनी केली

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या