चंद्रपूर :- तत्कालीन नगर परिषद, चंद्रपूर नियोजन व विकास समिती सभा दिनांक : २६/०७/१९९२ चा ठराव क्र. १२ व क्र. १३ नुसार चंद्रपूर येथील मुख्य बसस्थानका समोरील चौकास "महात्मा ज्योतिबा फुले चौक " असे नाव देऊन तेथे "महात्मा ज्योतिबा फुलेंचा "पूर्णाकृती पुतळा तत्कालीन नगर परिषदेद्वारे बसविण्याकरिता आणि जटपूरा गेट पासून पोलीस मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गास मंजूर ठरावाद्वारे "महात्मा ज्योतिबा फुले " मार्ग देण्यात आलेले होते.
तसेच ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या वर्षी " क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले " यांची २०० वि जयंती हि " द्विशताब्दी जयंती महोत्सव " म्हणून साजरा करण्याचे शाशनातर्फे नियोजित आहे. त्या" क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले " दाम्पत्यांनी भारतीय शोषित पीडित गोरगरीब जनसामान्य सर्व नागरिकांसाठी जनहिताचे केलेले कार्य कधीही न विसरणारे व त्यांनी केलेल्या जनसेवेचे भावना नेहमीच सामान्य नागरिकांच्या लक्षात व आठवणीत जिवंत राहण्याकरिता उपरोक्त ठरावानुसार चंद्रपुरातील मुख्य बसस्थानक समोरील चौकात " क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले " यांचा पूर्णाकृती पुतळा महानगर पालिकेतर्फे उभारून माहात्म्यास खऱ्या अर्थाने अभिवादन करता येईल. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक २५/०३/२०२६ ला .चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे सन्मानीय महापौर सौ. संगीताताई राजेंद्रजी खांडेकर . सन्मानीय उपमहापौर श्री. प्रशांतजी आनंदराव दानव आणि सन्मानिय आयुक्त श्री. अकुनूरी नरेश ( I.A.S ) यांना निवेदन देण्याकरीता सन्मानीय प्रदीपजी पाटील, अनिलजी बनकर, डॉ .संजयजी घाटे महात्मा फुले समता परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष नगरसेविका सौ. शीतल ताई रवीजी गुरनुले, सौ. वैशाली ताई अजयजी महाडोळे, सौ. प्रतीक्षा ताई अक्षयजी येरगुडे, नगरसेवक पप्पूभाऊ देशमुख श्री. भालचंद्रजी भय्याजी दानव, श्री. विनोदभाऊ लभाने, माजी नगर सेवक रवीजी गुरनुले तसेच अजयभाऊ महाडोळे, श्री सचिन भय्याजी निंबाळकर, श्री. कुणाल श्रीकांतजी चहारे, श्री.सुरेशजी कावळे, श्री. राजुजी साखरकर, माजी मुख्याधापक श्री. विनोदजी राऊत, श्री. राहुल प्रभाकरराव बनकर, श्री. योगेशजी निकोडे, श्री. विश्वासजी बनकर, श्री. राजेंद्रजी नागरकर, श्री. शिरीशजी वासेकर श्री. रवीजी बनकर, श्री. अक्षयजी येरगुडे, श्री. मनोजजी वासेकर इत्यादींची प्रमुख उपस्थीती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या