जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर व दे-आसरा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 24 मार्च रोजी उद्योजक मेळावा (An Entrepreneurship Fair will be held tomorrow, March 24, organized jointly by the District Skill Development, Employment, and Entrepreneurship Guidance Centre; Dr. Ambedkar College, Chandrapur; and the De-Asra Foundation, Pune.)
जिल्ह्यातील 10 वी, 12 वी आय.टी.आय. पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी उद्योगजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करावी. उमेदवारांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या