चंद्रपूर :- मनपा निवडणुकीत नामांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांत तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ उडाला आहे. भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर तिकीट विक्रीचे आरोप होत असताना, काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही असेच आरोप नाराज कार्यकत्यांनी केले आहेत. एबी फॉर्म न मिळालेल्या अनेकांनी बंड पुकारले आहे. यामुळे नेत्यांना कार्य-कर्त्यांची मनधरणी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती बंडखोर शांत होतात, यावर अंतिम चित्र अवलंबून आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्यांना तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ना-मांकनाच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा भडका उडाला. भाजपमध्ये माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील गटबाजी उघड झाली. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर हे जोरगेवार गटाला पाठिंबा देतात. तिकीट वाटपासाठी दोन्ही गटांत तीव्र रस्सीखेच होती. प्रदेश नेतृत्वाने नागपुरात बैठक घेऊन यादी अंतिम केली, तरी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांनी जोरगेवारांच्या दबावाखाली अनेक नावे बदलली आणि आपल्या समर्थकांना एबी फॉर्म दिले. सुनील डोंगरे, मनोज पोतराजे, माया उईके, विशाल निंबाळ कर, बाळू कोतपल्लीवार आणि मुग्धा जोरगेवारांवर तिकीट विक्रीचे गंभीर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. या प्रकरणाची प्रदेश नेतृत्वाने दखल घेऊन कासनगोडूवार यांना पदावरून हटवले. काँग्रेसमध्येही परिस्थिती वेगळी नाही. खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष घोटे यांचा तिकीट वाटपात प्रभाव दिसून आला. आमदार विजय वडेट्टीवार गटातील अनेक समर्थकांना डावलण्यात आले. मागील निवडणुकीतील १२ पैकी ९ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले गेले, यात सुनीता लोढीया, नंदू नागरकर, अशोक नागापुरे, विना खनके, सकीना अन्सारी, प्रशांत दानव, निलेश खोब्रागडे आणि सुरेश महाकुलकर यांचा समावेश आहे. नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याने नाराज निष्ठावंतांनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेतले किंवा अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. बंडखोरांची मनधरणी न झाल्यास मोठी डोकेदुखी ठरू शकते. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी नामांकनाच्या अंतिम दिवशी उमेदवारी जाहीर केली. असे करूनही अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांसमोर बंडखोरीचे आवाहन निर्माण झाले आहे. पंक्षांतर्गत नाराजीसत्राचे परिणाम मतदानावर होऊन तिसऱ्या पक्षाचा अथवा अपक्ष उमेदवाराचा लाभ होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. ६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. २) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास कोणत्या प्रभागातून कोणता पक्ष यशस्वी होते? हे पाहण्यासारखे आहे. बंडखोर उमदेवारांनी अर्ज मागे न – घेतल्यास पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आवाहन निर्माण होईल हे निश्चित आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या