Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन (Tributes were paid to Krantijyoti Savitribai Phule on the occasion of her birth anniversary at Mahatma Phule College.)

महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन (Tributes were paid to Krantijyoti Savitribai Phule on the occasion of her birth anniversary at Mahatma Phule College.)


बल्लारपूर :- भारतात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीच्या निमित्ताने बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना या दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. 


            या वेळी विचारमंचावर डॉ. रजत मंडल, (प्रभारी प्राचार्य), डॉ. पल्लवी जुनघरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी), प्रा. शुभांगी भेंडे रासेयो सहकार्यक्रम अधिकारी), प्रा. विभावरी नखाते सांस्कृतिक विभाग, यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. रजत मंडल म्हणालेत की, " सावित्रीबाई फुले या आधुनिक भारताच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरल्या त्यांच्या द्वारे केल्या गेलेल्या स्त्री शिक्षणाच्या प्रसारा मुळे वर्तमान काळात महिलांनी शिक्षण क्षेत्रासोबत विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली असून भारतातील स्त्रीयांनी देशातील सर्वोच्च पदे भूषविली आहेत." यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, यांच्या सह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या