स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन आरोपींकडून सुमारे ९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त (The local crime branch took action, seizing gold ornaments worth approximately 975,000 rupees from two accused.)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील दोन आरोपींकडून सुमारे ९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून मोठे यश मिळविले आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तनविर कादीर बेग (वय २३), रा. भंगाराम वार्ड, चंद्रपूर व सुजल दिलीप ताकसांडे (वय २३), रा. डॉ. जाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून अंदाजे ९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सदर दागिने हे चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील भिवापूर वार्ड येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या