चंद्रपूरात एकाच प्रभागातून राष्ट्रवादीकडून पत्नी, काँग्रेसपक्षाकडून पती निवडणुकीच्या रिंगणात तर भारतीय जनता पार्टी कडून पती-पत्नी दाम्पत्याला उमेदवारी (In Chandrapur, in the same ward, the wife is contesting the election from the Nationalist Congress Party, the husband from the Congress party, while the Bharatiya Janata Party has fielded a husband-wife couple as candidates.)
चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई ऊईके या एमईएल प्रभाग क्रमांक ३ मधून पक्षाच्या उमेदवार आहे तर त्यांचे पती काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर महापालिका निवडणुक होत असल्याने येथे प्रत्येकाला नगरसेवक व्हायचे आहे. नगरसेवक बनण्यासाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत नेत्यांचे पीए धडपड करीत आहेत. या सर्वांच्या धडपडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई ऊईके यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाचे २९ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. विशेष म्हणजे स्वतः बेबीताई ऊईके या एमईएल प्रभागातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे. तर याच प्रभागात त्यांचे पती लोमेश ऊईके काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे. म्हणजे पती पंजा चिन्हावर तर पत्नी पिपाणी चिन्हावर उभ्या राहून एकाच प्रभागात मत मागणार आहे. या संपूर्ण राजकारणात राष्ट्रवादीच्या चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष बेबीताई ऊईके यांनी पक्षाच्या नेत्यांसोबतच काँग्रेस नेत्यांशी बनवाबनवी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आघाडीसाठी बोलणे सुरू होते. राष्ट्रवादीने पाच तिकीट मागितल्या होत्या तर काँग्रेसने दोन तिकीट देण्यासाठी तयार होते. मात्र राष्ट्रवादीचे नेत्यांनी वडगाव प्रभागात केवळ एक नगरसेवक असलेल्या जनविकास सेनेला ३ जागा सोडू शकता तर दोन पेक्षा अधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला दोन जागा कशा. यावर बराच खल आल्यानंतर बेबीताई यांनी स्वतः राष्ट्रवादी कडून तर पतीला काँग्रेआ पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवर असा निर्णय घेण्यात आला की नेत्यांच्या कुटुंबियांना तसेच एकाच कुटुंबातील व्यक्तींना पक्षाचे उमेदवारीचे तिकीट देण्यात येणार नाही मात्र चंद्रपूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव प्रभागातून सौ राखी संजय कंचर्लावार यांना तर भानापेठ प्रभागातून संजय कंचर्लावार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या