दीक्षाभूमीच्या प्रस्तावित विकास कामांचा संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न (A meeting regarding the proposed development works at Deekshabhoomi was held under the chairmanship of Social Justice Minister Sanjay Shirsat.)
नागपूर :- दीक्षाभूमी जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान असल्याने येथे होणाऱ्या सर्व कामांचे नियोजन अत्यंत संवेदनशीलतेने, शास्त्रीय पद्धतीने आणि स्तूपाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता पूर्ण दक्षता घेऊन आणि मुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीने करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा मंत्री श्री. शिरसाट यांनी आज नियोजन भवन येथे घेतला. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो.ना.बागुल तसेच सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या