Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

व्हॉईस ऑफ मीडिया’चा साप्ताहिक विंग राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर! चंद्रपूरचे जितेंद्र ध. जोगड ठरले राज्यातील मानकरी पत्रकार ! (Voice of Media's weekly wing announces state-level excellent office bearer award! Jitendra D. Jogad of Chandrapur becomes the state's best journalist!)

व्हॉईस ऑफ मीडिया’चा साप्ताहिक विंग राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर! चंद्रपूरचे जितेंद्र ध. जोगड ठरले राज्यातील मानकरी पत्रकार ! (Voice of Media's weekly wing announces state-level excellent office bearer award! Jitendra D. Jogad of Chandrapur becomes the state's best journalist!)

पंढरपूर :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे देण्यात येणारे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाधिकारी पुरस्कार - २०२५ जाहीर झाले असून, यामध्ये चंद्रपूर जिल्हा साप्ताहिक विंगचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्र ध. जोगड यांची साप्ताहिक विंगच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही घोषणा संघटनेचे मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही जगातील ५६ देशांमध्ये कार्यरत आणि तब्बल ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्यसंख्या असलेली जगातील क्रमांक एक पत्रकार संघटना आहे. संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात होणार आहे. या अधिवेशनात निवड झालेल्या सर्व मान्यवरांचा गौरव प्रमुख अतिथींच्या हस्ते केला जाणार आहे. निवड प्रक्रियेत विविध विभागातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विंग पदाधिकाऱ्यांचे वर्षभरातील कार्य व योगदान विचारात घेण्यात आले.
         या निवड प्रक्रियेत जिल्हाध्यक्ष म्हणून व्यंकटेश धुडूमवार (गडचिरोली), राजेश भालेराव (जालना), रमाकांत पाटील (नंदुरबार), अनिल करंदकर (सातारा), मंगल डोंगरे (ठाणे), रुपेश पाटील (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. तालुकाध्यक्षांमध्ये राजू कापसे (रामटेक), गंगाधर ढवळे (नायगाव), उमेश काटे (अमळनेर), गणेश आवळे (मिरज) आणि भारत म्हात्रे (वसई) यांची निवड झाली आहे. तर विंग स्तरावर सुद्धा सन्मान जाहीर झाले असून महिला विंगमधून लक्ष्मी वाडेकर (बुलढाणा), साप्ताहिक विंगमधून जितेंद्र जोगड (चंद्रपूर), रेडिओ विंगमधून अनुप फुसके (सातारा), डिजिटल विंगमधून वसंत खडसे (वाशीम) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेत अजित कुंकुलोळ, कुमार कडलग, नरेंद्र देशमुख, अमोल मतकर, मिलिंद टोके, बापूराव पाटील, किशोर करंजेकर, वैशाली पाटील, रश्मी मारवाडी आणि किरण ठाकरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मंगेश खाटीक, महिला विंग प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, रेडिओ विंग प्रदेशाध्यक्ष इर्षाद शेख, साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कईम यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे साप्ताहिक विंग अध्यक्ष जितेंद्र जोगड यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्याचे मनापासून कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या