चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिकेची प्रभाग रचनेची आरक्षण सोडत आज 11 नोव्हेंबर रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सकाळी 11 वाजताच्या सुमारास जाहीर करण्यात आली. या सभेला महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले यांच्या सह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चंद्रपूर महानगर पालिकेत 17 प्रभागातून 66 जागा असून त्यापैकी 33 महिलांसाठी आरक्षित असतील यानुसार 15 प्रभागातून प्रत्येकी 4 प्रमाणे 60 तर 16 व 17 प्रभागातून प्रत्येकी 3 प्रमाणे 6 असे 66 नगरसेवक निवडले जातील. आरक्षण सोडतीनुसार 13 जागा अनुसूचित जाती प्रवर्गा साठी राखीव असून त्यापैकी 7 जागा अनुसूचित जाती महिला साठी राखीव असतील तसेच अनुसूचित जमाती साठी 5 जागा राखीव असून त्यापैकी 3 जागा महिला साठी राखीव असतील. तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 17 जागा आरक्षित असतील त्यापैकी 9 जागा महिलांसाठी राखीव असतील तर 31 जागा या सर्वसाधारण साठी राखीव असून त्यापैकी 16 जागा या महिलासाठी राखीव असतील या आरक्षण सोडतीत राजकीय नेत्यामध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटत असून 17 नोव्हेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल तर 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यावर आक्षेप वं हरकती नोंदविण्याचे आवाहन महानगपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे सदर आरक्षण सोडत ही लोकमान्य कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ईश्वरचिट्ठी द्वारे काढण्यात आली या सभेचे संचालन महानगर पालिकेचे उपायुक्त मंगेश खेवले यांनी केले असून या आरक्षण सोडतीला विविध राजकीय पक्षाचे नेते, पत्रकार, अधिकारी वर्ग व नागरिकांची उपस्थिती होती.
प्रभाग निहाय आरक्षण सोडत
प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम (ST – महिला, OBC- पुरुष, सर्वसाधारण -महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर (SC – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ३ एम.ई.एल (SC – पुरुष, ST – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर (SC पुरुष, OBC महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ६ इंड्रस्टीयल इस्टेट (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ८ वडगाव (OBC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १० एकोरी (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक ११ भानापेठ (ST महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १२ महाकाली (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा (भिवापूर) (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर (Obc महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (Sc महिला, ST महिला, सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १७ डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Sc पुरुष, St पुरुष, सर्वसाधारण महिला)
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या