Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

आयटक चे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन ! कोरोना काळातील थकीत मानधन देण्याची मागणी ! (Statement to Sudhir Bhau Mungantiwar MLA of AITK! Demand for unpaid wages in the Corona era !)

आयटक चे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन ! कोरोना काळातील थकीत मानधन देण्याची मागणी ! (Statement to Sudhir Bhau Mungantiwar MLA of AITK! Demand for unpaid wages in the Corona era !)


चंद्रपूर :- आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना चंद्रपूर द्वारा कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक यांच्या मार्गदर्शनात मा.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी निवेदन देऊन मनपा, नगर परिषद बलारपूर, भद्रावती, नगर पंचायत पोंभुर्णा, गडचांदुर, चिमूर, नागभीड, जिवती व सावली अंतर्गत आरोग्याचा काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना कोरोना काळातील केलेल्या कामाचा मोबदला दरमहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या सोबत लवकरच बैठक घेऊन मानधन मिळवून देणार असल्याचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मान्य केले आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रात्र न दिवस कोरोना बाधित लोकांचे सर्व्हे करणे, गोळ्या वाटप करणे, कोरंटाइन करणे यासह अनेक कामाची जोखीम पत्करून कोरोना सारख्या महा भयानक आजाराला हद्द पार करण्यासाठी आशा वर्कर यांची भूमिका महत्वाची आहे आणि या कामाची खुद दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेऊन आशा वर्कर यांचा जागतिक स्तरावर सन्मान केला आहे तरीपण त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला अजूनही थकीत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे तेव्हा तातडीने थकीत मानधन देण्याची मागणी आयटक संघटनेनी केली आहे यावेळी निवेदन देताना बल्लारपूर शहर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटक चे अध्यक्ष वसुधरा करमनकर, सचिव सुनीता घुबडे, गायत्री हिरण ,प्रणाली चांदेकर, प्रियंका रामटेके, कल्पना देवईकर यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या