भारतीय हवामान खात्याचा उद्या चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यात 'रेड अलर्ट', अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळं जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर ! (The Indian Meteorological Department has issued a 'red alert' in Chandrapur and Gadchiroli district tomorrow, due to the possibility of heavy rain, the schools and colleges of the district have been declared a holiday !)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक २७/०७/२०२३ रोजी चंद्रपूर अतिवृष्टी शक्यता आहे तसेच जुलै महिन्यातील मागील काही दिवसापूर्वी यापूर्वी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने व अनेक गांवाना पुराचा वेढा पडल्याने जनजिवन विस्कळित होण्याच्या घटना घडल्या आहेत. करिता चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक २७/०७/२०२३ रोजी बंद ठेवण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर विनय गौडा जी सी यांनी जाहीर केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)