Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

"मृत्यू किती सुंदर आहे जर कोरोना पुन्हा आल्यास मला मरायला आवडेल." अशा प्रकारची चिट्ठी लिहून १३ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, नागपुरातील धक्कादायक घटना !

 "मृत्यू किती सुंदर आहे जर कोरोना पुन्हा आल्यास मला मरायला आवडेल."

अशा प्रकारची चिट्ठी लिहून १३ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, नागपुरातील धक्कादायक घटना !

नागपूर :- मृत्यू किती सुंदर आहे, मृत्यूला कवटाळायला मला आवडेल.डेथ इज गोल्ड.मृत्यूशी मला मैत्री करायची आहे" अशा प्रकराचे वाक्य लिहून आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. आर्या हरिश्चंद्र मानकर (१३) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र मानकर हे व्हिएनआयटी महाविद्यालायात नोकरीवर आहेत. ते पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह चंद्रमणीनगरात राहतात. मुलगा MSC तर मुलगी बारावीत आहे. लहान मुलगी आर्या ही माऊंट कारमेलमध्ये आठवीची विद्यार्थिनी होती. आर्या अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिला डायरी लिहिण्याची सवय होती. गेल्या काही महिन्यांपासून ती अबोल झाली होती. ती सारखी वहीमध्ये मृत्यूसंदर्भात अनेक विचारवंताचं सुभाषित लिहित होती. त्यासाठी आर्याने तीन वह्या तयार केल्या होत्या. त्यामध्ये तिने मृत्यूवर कविता लिहिली होती. मृत्यू किती सुंदर आहे.यावर तिने आपले विचार मांडले होते. 'जर करोना पुन्हा आला..तर मला मरायला आवडेल.' असा उल्लेख तिने वहीत केला होता. सोमवारी सकाळी वडील नोकरीवर गेले तर आई स्वयंपाक करीत होती. बहिण ट्युशनला गेली होती. यावेळी आर्याने अभ्यासाच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आई जेवायला आवाज देण्यासाठी खोलीत गेली असता तिला धक्का बसला. आईने हंबरडा फोडल्यानंतर शेजारी गोळा झाले. याप्रकरणी अजनीच्या सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी माहोरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, अभ्यास हुशार असलेल्या आर्याच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या