Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सिंदेवाही जवळील पाथरी मार्गावर टाटा एस व दुचाकींचा भीषण अपघात ! गुंजेवाही येथील ग्रामसेवक जागीच ठार

सिंदेवाही जवळील पाथरी मार्गावर टाटा एस व दुचाकींचा भीषण अपघात ! गुंजेवाही येथील ग्रामसेवक जागीच ठार

सिंदेवाही :- सिंदेवाही शहरापासून जवळच पाथरी रोड वरील शासकीय आयटीआयच्या जवळ झालेला भीषण अपघातात सरडपार गुंजेवाही येथील ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या ५:३० वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की सरडपार  येथील ग्रामसेवक रामकृष्ण शामराव इरपाते  वय ४० वर्ष रा. मेंडकी ता. ब्रह्मपुरी यांच्याकडे  गुंजेवाही येथील ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा अतिरिक्त प्रभार होता. ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते हे  गुंजेवाही वरून  युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए डब्ल्यू ६४५३  या गाडीने येत असताना टाटा एस ऑटो  क्रमांक एम एच ३६ एफ ९३१ या गाडीला जोरदार समोरा समोर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांचे चमू तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले .घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचारी व ग्रामसेवक बघण्याची दवाखान्यात गर्दी केली होती सदर घटनेची पुढील चौकशी पोलीस स्टेशन  करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या