बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व सिध्दार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल (सावंगी मेघे) वर्धा च्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन
बल्लारपूर :- रविवार दिनांक २४/४/२०२२ ला जनता हायस्कूल (सिटी ब्रँच) बल्लारपूरच्या पटांगणावर सकाळी ९.०० वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व सिध्दार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, सावंगी मेघे वर्धा व बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान शिबीर च आयोजन करण्यात आलेल आहे.... या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री विजय वडेट्टीवार साहेब, खासदार श्री सूरेश धानोरकर साहेब, आमदार श्री सुभाष धोटे साहेब, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे साहेब, श्री अरुण धोटे साहेब , डॉ रजनी हजारे, चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष श्री रामु तिवारी साहेब उपस्थित राहणार असून आपन सर्व सन्माणनिय नेतागण सर्व सन्माणनिय पदाधिकारी तसेच सर्व सन्माणनिय नगर सेवक सर्व फ्रंटल आर्गनायजेशन चे पदाधिकारी आणि सर्व सन्माणनिय कार्यकर्ता गण यांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व या रोग निदान शिबीर चा लाभ आप आपल्या वार्डातील गरजु लोकांना मिळावा याचा प्रयास करावा.... या रोगनिदान शिबिरा अंतर्गत ह्रदयरोग, कॅन्सर, मुखरोग, स्त्री रोग, मणक्याचे आजार, किडनी, मेंदू रोगाचे निदान व शस्त्रक्रिया करण्यात येईल या व्यतिरिक्त सर्व आजारावर तपासणी करण्यात येईल, विशेष म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रोगावर मोफत उपचार करण्यात येईल तरी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री रवि मातंगी, श्री सचीन तोटावार, हाजी ईस्माइल ढाकवाला जी व त्यांचे सहकारी, कार्यकर्ते य कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेहणत घेत आहेत तरी या रोगनिदान शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा.अब्दुल करीम, अध्यक्ष बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या