Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

शेगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची हत्या, संशयाच्या आधारे 2 व्यक्तींना अटक !

शेगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची हत्या, संशयाच्या आधारे 2 व्यक्तींना अटक !




वरोरा :- शेगांव येथील महात्मा गांधीं तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महेश बबनराव घोडमारे वय 30 वर्ष, यांची दगड व रॉड ने वार  करीत निघृण पणे हत्या कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेहमी  समाजकार्यात तत्पर असणारे  व सेतू केंद्राच्या माध्यमातून  उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र काढून देण्याचे काम महेश घोडमारे करीत होते. अशा प्रकारची सेवा करून महेश आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र मागील 3 दिवसापासून महेश काही काम असल्याचे सांगून घराबाहेर पडले ते परत आलेच नाही यामुळे महेश च्या कुटुंबीयांनी याबाबत शेगांव पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. या वरून शेगांव पोलिसांनी तपास सुरु केला या दरम्यान महेश हा मेसा या गावावरून दुचाकी वर बसून वरोरा गेल्याची माहिती मिळाली मात्र तीच दुचाकी मेसा येथील जंगलव्याप्त क्षेत्रात आढळून आल्याने पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता  पोलिसांना चप्पल, लोखण्डी रॉड, रक्ताने माखलेला दगड, व काही अंतरावर महेशचा मृतदेह आढळून आला. त्यामुळं शेगांव पोलिसांनी महेशची हत्या ही लोखण्डी रॉड व दगडाने ठेचून कऱण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला या प्रकरणात शेगांव पोलिसांनी खडसंगी व शेगांव येथून 2 व्यक्तींना अटक केल्याची माहिती असून त्यांनी आपल्या गुन्हा कबूल केला मात्र या हत्येमागचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालं नाही या घटनेचा पुढील तपास शेगांव येथील पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली शेगांव पोलीस करीत आहें.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज),  मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या