Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूरच्या शेतकऱ्याना होणार लाभ, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान वित्त व हवामान जोखीम व्यवस्थापनाला बळ, ‘द्वारा ई-रजिस्ट्रीच्या’ माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण (Farmers in Chandrapur set to benefit; Chief Minister’s initiative strengthens technology, finance, and weather risk management for farmers; Farmer Producer Companies empowered through ‘Doorstep e-Registry’.)

चंद्रपूरच्या शेतकऱ्याना होणार लाभ, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान वित्त व हवामान जोखीम व्यवस्थापनाला बळ, ‘द्वारा ई-रजिस्ट्रीच्या’ माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण (Farmers in Chandrapur set to benefit; Chief Minister’s initiative strengthens technology, finance, and weather risk management for farmers; Farmer Producer Companies empowered through ‘Doorstep e-Registry’.)

चंद्रपूर :- शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) सक्षम करणे, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व वित्तपुरवठ्याशी जोडणे तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या जोखमींचा सामना करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘द्वारा ई-रजिस्ट्री’ (डीईआर) उपक्रम राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून हे काम विस्तारले आहे. ‘द्वारा ई-रजिस्ट्री’ हा उपक्रम 2021 पासून महाराष्ट्रात, शेतकरी समूहांचे संस्थात्मक बळकटीकरण, सक्षम कृषी मूल्यसाखळीची निर्मिती आणि छोट्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, कर्ज व जोखीम संरक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करीत आहे. चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना विस्तारित नेटवर्कचा लाभ चंद्रपूर जिह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून शेतकरी संस्थांचा उपयोग तंत्रज्ञान, वित्त, कृषीविषयक मार्गदर्शन आणि बाजाराभिमुख उत्पादनासाठी व्यासपीठ म्हणून केला जात आहे. हवामानातील बदल आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामान व पीकविषयक सल्ला, हवामान-स्मार्ट शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके आणि जैविक निविष्ठांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. बाजाराशी जोडणी मजबूत करण्यासाठी सोयाबीन बीजोत्पादन, बीजप्रक्रिया, फॉस्फो-जिप्समच्या माध्यमातून मृदा सुधारणा, आधुनिक कृषी उपकरणांचा वापर, जैविक निविष्ठा, हिरव्या चाऱ्यासाठी सायलेज तसेच नाफेडच्या खरेदी व्यवस्थेशी जोडणी अशा विविध उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 70 हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबतच्या भागीदारीतून आतापर्यंत 20 हजार 468 शेतकरी कर्ज वितरण प्रकरणांमध्ये सुमारे 101.03 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
        तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक नुकसानीचे वैयक्तिक मूल्यांकन हवामान बदलामुळे वाढणाऱ्या पीक जोखमींच्या पार्श्वभूमीवर रिमोट सेन्सिंग आणि छायाचित्र-आधारित मूल्यांकन पद्धतीचाही वापर करण्यात येत आहे. भौगोलिक संदर्भासह शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या छायाचित्रांची आणि संबंधित शेतजमिनीच्या माहितीची सांगड घालून वैयक्तिक शेतपातळीवर पीक स्थिती व नुकसानीचे मूल्यांकन करण्याचा या प्रणालीचा उद्देश आहे. 'महाएआय' अंतर्गत मोठ्या स्वरूपातील प्रायोगिक प्रकल्पात खरीप हंगामातील 4 हजार आणि रब्बी हंगामातील 1 हजार अशा एकूण 5 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येत आहे. पीक नुकसानीचे अधिक जलद, सूक्ष्म आणि पारदर्शक मूल्यांकन करण्यासोबतच वैयक्तिक स्तरावरील पीकविमा उपाययोजनांना मदत करणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे. एफपीओसाठी खेळत्या भांडवलाचीही सुविधा शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यासोबतच एफपीओच्या व्यवसायासाठी आवश्यक खेळत्या भांडवलाचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘द्वारा ई-रजिस्ट्रीने’ ‘नाबकिसान’ सोबत भागीदारी केली आहे. कृषीमालाचे एकत्रीकरण, खरेदी आणि बाजारपेठेतील व्यवहारासाठी एफपीओ ना खेळते भांडवल मिळावे यासाठी कागदपत्रांची पूर्तता, कर्ज अर्जाची तयारी आणि वित्तीय संस्थांशी समन्वयासाठी सहाय्य केले जाते. चंद्रपूर सारख्या हवामानातील अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या कृषिप्रधान जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित कृषी सेवा, सुलभ कर्ज, बाजारपेठेची जोड आणि पीक जोखीम संरक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांच्या विस्ताराला महत्त्व आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या