Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

MPSC चा मोठा निर्णय! २ हजार ६१९ पदांची 'गट-क' परीक्षा आता ऑफलाईन; पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या (Major decision by MPSC! The 'Group-C' exam for 2,619 posts will now be held offline; dates for the preliminary and main exams have been changed.)

MPSC चा मोठा निर्णय! २ हजार ६१९ पदांची 'गट-क' परीक्षा आता ऑफलाईन; पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या (Major decision by MPSC! The 'Group-C' exam for 2,619 posts will now be held offline; dates for the preliminary and main exams have been changed.)

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६  रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ तर संयुक्त मुख्य परीक्षा २०२६:  रविवार, २७ डिसेंबर २०२६ 

वृत्तसेवा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ आता ऑनलाईन (सीबीटी) ऐवजी जुन्या आणि प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन (ओएमआर आधारित) घेण्यात येईल. यासोबतच पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या नियोजित तारखांमध्येही मोठे बदल करण्यात आले असून उमेदवारांना दिलासा देत अर्ज सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत शुद्धिपत्रकानुसार, गट-क सेवा अंतर्गत उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, कर सहायक आणि तांत्रिक सहायक यांसारख्या विविध विभागांतील एकूण २,६१९ रिक्त पदांसाठी ही मेगा भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यापूर्वी २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये सदर परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (सीबीटी - ऑनलाइन) पद्धतीने घेतली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाला उमेदवारांकडून मोठा विरोध झाला होता. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागण्या आणि आयोगाकडे प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन, प्रशासनाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय थेट जुलै २०२७ अखेरपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यामुळे यंदाची म्हणजेच २०२६ ची पूर्व परीक्षा संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीनेच ओएमआर शीटवर घेतली जाईल. 
          महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: आता रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे (यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार होती). महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२६: सुधारित नियोजनानुसार रविवार, २७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: ३१ जुलै, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे). ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत). आयोगाने स्पष्ट केले आहे की, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) शुल्क भरणे आवश्यक आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या