अबब ! गुजरातमधील सुरतच्या एका हिरे व्यावसायिकाने तब्बल ९९९९ हिऱ्यांनी बनवली राम मंदिराची प्रतिकृती (Abba ! A diamond merchant from Surat in Gujarat made a replica of the Ram temple with as many as 9999 diamonds)
वृत्तसेवा :- 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील लोक आपल्या परीने रामल्लासाठी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता गुजरातमधील सुरत येथील एका व्यावसायिकाने हिऱ्यांचा वापर करून अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. सुरतच्या या एका कलाकाराने राम मंदिराची कलाकृती तयार करण्यासाठी तब्बल ९,९९९ हिऱ्यांचा वापर केला आहे. प्रत्येक देशवासीय वाट पाहत आहे की रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन, प्रभूराम कधी त्यांच्या मंदिरात विराजमान होतील. राजस्थानमध्ये अजय रावत या वाळू कलाकाराने राम मंदिराची कलाकृती तयार केली आहे. अजय रावत यांनी दररोज दोन ते चार तास काम केले आणि राम मंदिराची ही कलाकृती बनवण्यासाठी 1000 टनांहून अधिक वाळू वापरली गेली. उल्लेखनीय आहे की या आधीही अशी अनेक वेगळी उदाहरणं लोक पुढे आली आहेत, ज्यांनी आपल्या कलेतून प्रभू श्री रामाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक शिल्पकार नवरत्न प्रजापती यांनी पेन्सिलच्या टोकावर भगवान रामाची कलाकृती तयार केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments