Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

अभिजीत दिपकेंचा शिक्षण व्यवस्थेवर प्रहार; "गडचिरोलीतील शिक्षणव्यवस्था अजून मूलभूत गरजांपासून दूर " (Abhijit Dipke criticizes the education system; "Gadchiroli's education system is still far from meeting basic needs.")

अभिजीत दिपकेंचा शिक्षण व्यवस्थेवर प्रहार; "गडचिरोलीतील शिक्षणव्यवस्था अजून मूलभूत गरजांपासून दूर " (Abhijit Dipke criticizes the education system; "Gadchiroli's education system is still far from meeting basic needs.")

चंद्रपूरच्या स्वयंसेवकांचे कौतुक, चंद्रपूर जिल्ह्यात ५५ शाळांची पाहणी, अनेक शाळात दुरुस्ती प्रगती पथावर....

चंद्रपूर :- कोट्यवधींचा निधी, सरकारी योजना आणि शिक्षणाच्या गप्पा; मात्र प्रत्यक्षात गाऊंड वर शून्य अशी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वाट्याला छत नसलेली स्नानगृहे, दरवाजेविना स्वच्छतागृहे आणि सर्वत्र पसरलेले अस्वच्छतेचे साम्राज्य ! गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांची दुरवस्था पाहून 'स्कूल ठीक करो' अभियानाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे 'भामरागड येथील हेमलकसा परिसरातील स्व. बाबा आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पातील आश्रमशाळा वगळता अन्य आश्रमशाळा समाधानकारक स्थितीत दिसल्या नाहीत. विद्यार्थिनींच्या स्नानगृहांना छत आणि दरवाजे नाहीत. संडास आणि मूत्रघरांनाही दरवाजे नाहीत. त्यामुळे मुलींना उघड्यावर दैनंदिन गरजा भागवाव्या लागतात,'' असा गंभीर आरोप दिपके यांनी केला. दरम्यान ही सर्व वाईट अवस्था बघता या जिल्ह्याचे पालकमंत्री, आदिवासी विकास विभागाचे मंत्री, खासदार, आमदार नेमके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला. गडचिरोलीतील परिस्थितीवर मात्र त्यांनी संताप व्यक्त केला. ''काही विद्यार्थिनींची स्नानगृहे म्हशीच्या गोठ्यापेक्षाही वाईट अवस्थेत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शाळांची ही अवस्था असेल, तर निधी नेमका जातो कुठे?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.काही ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षक मद्यपान करून येत असल्याचे दौऱ्यात आढळल्याचा दावाही त्यांनी केला. अशा प्रकारे मद्यपान केलेले मुख्याध्यापक आढळल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
         गडचिरोलीतील दौरा आटोपून शुक्रवारी रात्री चंद्रपुरात पोहोचलेल्या दिपके यांचे सीजेपी स्वयंसेवकांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५५ शाळांची पाहणी करण्यात आली असून, तेथील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अनेक शाळांमध्ये दुरुस्तीची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. ''प्रशासनाला प्रश्न विचारणे, सातत्याने पाठपुरावा करणे आणि त्यातून प्रत्यक्ष बदल घडवून आणणे, हे चंद्रपूरच्या स्वयंसेवकांचे कौतुकास्पद काम आहे,'' असे दिपके म्हणाले. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयालाही त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मुबलक आहे; मात्र त्यांना केवळ शाळेची इमारत नव्हे, तर सुरक्षित वातावरण, मूलभूत सुविधा आणि दर्जेदार शैक्षणिक पाठबळ देण्याची गरज असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.. ''मर्यादित साधनांत बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांनी उभा केलेला आदर्श सरकारसमोरच आरसा धरतो,'' अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली. चंद्रपूर दौरा आटोपून दिपके अमरावतीकडे रवाना झाले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या