Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारशाह रेल्वे स्थानकात 12 नोव्हेंबरपासून तात्काळचे तिकिटाचे आणखी एक काउंटर, ZRUCC सदस्य अजय दुबे यांच्या यशस्वी प्रयत्नांना यश सणासुदीत प्रवाशांना होणार लाभ (An additional 'Tatkal' ticket counter to open at Ballarshah railway station from November 12; initiative succeeds thanks to the efforts of ZRUCC member Ajay Dubey—passengers to benefit during the festive season.)

बल्लारशाह रेल्वे स्थानकात 12 नोव्हेंबरपासून तात्काळचे तिकिटाचे आणखी एक काउंटर, ZRUCC सदस्य अजय दुबे यांच्या यशस्वी प्रयत्नांना यश
सणासुदीत प्रवाशांना होणार लाभ (An additional 'Tatkal' ticket counter to open at Ballarshah railway station from November 12; initiative succeeds thanks to the efforts of ZRUCC member Ajay Dubey—passengers to benefit during the festive season.)

बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानकात उद्या 12 नोव्हेंबरपासून तत्काळ तिकिटासाठी आणखी एक काउंटर सुरू करण्यात येणार आहे. ZRUCC सदस्य अजय दुबे यांनी आज 11 नोव्हेंबर रोजी श्री अमन मित्तल, वरिष्ठ डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सणासुदीत प्रवाशांची गर्दी आणि होणारी गैरसोय याबाबत माहिती देत आणखी एक तत्काळ काउंटर सुरू करण्याची विनंती केली होती. श्री मित्तल यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन काउंटर सुरू करण्याचे तात्काळ निर्देश दिले. उल्लेखनीय आहे की, बल्लारशाह हे मध्य रेल्वेचे या दिशेने दक्षिण भारतात जाण्यासाठी शेवटचे आणि महत्त्वाचे स्थानक आहे. जंक्शन असल्याने दररोज जवळपास दीडशे प्रवासी गाड्यांची ये-जा होते, प्रत्येक गाडी येथे थांबते. जवळपास 22 राज्यांतील लोक येथे राहतात, यामध्ये स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने आहेत. दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा आदी प्रमुख सणांमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढते, मात्र तत्काळ तिकिटाचे एकच काउंटर असल्याने अनेक प्रवासी तिकिटापासून वंचित राहतात. त्यामुळे आणखी एका तत्काळ तिकिट काउंटरची तीव्र गरज भासत होती. प्रवाशांच्या विनंतीवरून ZRUCC सदस्य अजय दुबे यांनी वरिष्ठ डीसीएम श्री अमन मित्तल यांच्याकडे विनंती करून तात्काळ आणखी एक काउंटर मंजूर करून घेतले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या