बल्लारपूरात स्वातंत्र्याचा 80 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुख्य शासकीय कार्यक्रम तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण (The 80th anniversary of Independence was celebrated with enthusiasm in Ballarpur; the main official event took place at the Tehsil office, where Sub-Divisional Officer Dr. Arjun Pavra hoisted the flag.)

नगर परिषदेत नगराध्यक्षा अल्काताई वाढई, व ऐतिहासिक किल्ल्यावर उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न 

बल्लारपूर :- भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन बल्लारपूर शहरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, नगर परिषद तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९.०५ वाजता उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस विभाग आणि होमगार्डच्या जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार रेणुका कोकाटे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, अजय मल्लेलवार, विनोद निखाते यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. यासोबतच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य आणि माजी सैनिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा अल्काताई अनिल वाढई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, साठा विभाग प्रमुख उपेंद्र धामनगे, लेखापाल अनिर्बन चक्रवर्ती, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते अब्दुल करीम, ॲड. मेघा भाले, नगरसेवक लखन सिंह चंदेल, गोलू डोहने यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर आणि पत्रकारांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
            बल्लारपूरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र सत्यदेव आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अल्का वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारकर, संगीता उमरे, पोलीस दल, विविध शाळांचे विद्यार्थी शासकीय निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी, आजी माजी नगरसेवक यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर आणि पत्रकारांचीही उपस्थिती होती स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस स्थानक मध्ये पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले तसेच शहरातील शाळा-महाविद्यालय विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात सामाजिक संघटना राजकीय पक्षांनीही स्वातंत्र्याचा महोत्सव उत्साहात साजरा केला एकूणच शहरातील विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. अशाही परिस्थितीत पोलीस विभागाने वाहतूक नियमाचे पालन व्हावे यादृष्टीने अनेक वाहनचालकांना समज देतांना व आपलं कर्तव्य पार पाडताना दिसून आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068