चंद्रपूर :- बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील बुध्दगया येथिल महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी देशभरात आंदोलन सुरु आहे. या अंतर्गत येत्या २८ मार्च ला चंद्रपूर येथे सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर शहराच्या मध्यभागी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळया पासुन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुतळा मार्गाने जटपुरा गेट प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मार्च काढला जाणार आहे. शांती मार्च चे नेतृत्व भिक्खुगण तर नियंत्रण समता सैनिक दल करणार आहे. या संदर्भात नुकतेच विकास केंद्र, चंद्रपूर येथे बैठक घेण्यात येवून शांती मार्च काढण्याबाबतचा निर्णय समता सैनिक दलाचे वतीने घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर लगेच सभा घेण्यात येईल. शांती मार्च मध्ये भारतीय बौध्द महासभा व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ता सहभागी होतील. बुध्दगया येथील महाबोधी महाविहार संदर्भातील बौध्दगया टेंपल अक्ट १९४९ रद्द करावे. महाविहाराचा ताबा व व्यवस्थापन संपूर्णपणे बौध्दांच्या हातात देण्यात यावे. तसेच बुध्दगया येथे उपोषण व आंदोलन करीत असलेल्या विचारवंत व बौध्द भिक्खू आणि अनुयायांवर पोलिसांनी बल प्रयोग बंद करावे या प्रमुख मागण्या आहेत. या मागणी करिता चंद्रपूर जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक मार्शल धनराज पुणेकर यांनी जास्तीत जास्त प्रमाणात बुद्ध अनुयायांनी उपस्थिती दर्शवावी अशी विनंती केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या