चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २३.४६ ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर किंमत १ लाख ४० हजार ७६० वाहनाची किंमत ८ लाख असा एकुण ९ लाख ४० हजार ७६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Action of Local Crime Branch in Chandrapur, 23.46 grams MD. (Mephodrone) powder price 1 lakh 40 thousand 760 vehicle price 8 lakh total worth 9 lakh 40 thousand 760 rupees confiscated)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २३.४६ ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर किंमत १ लाख ४० हजार ७६० वाहनाची किंमत ८ लाख असा एकुण ९ लाख ४० हजार ७६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Action of Local Crime Branch in Chandrapur, 23.46 grams MD. (Mephodrone) powder price 1 lakh 40 thousand 760 vehicle price 8 lakh total worth 9 lakh 40 thousand 760 rupees confiscated)


चंद्रपूर :- चंद्रपुर पोलीसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करून पथकाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ड्रग्सची विक्री करणाऱ्यांची गोपनिय माहिती काढून त्यावर कारवाई सपाटा सुरु असतांनाच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकास गोपनिय माहिती मिळाली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन येत असतांना दिसताच वाहनाचा पाठलाग केला. निमबाटीका जवळ वाहन थांबवून वाहनातील इसमांना ताब्यात घेत त्यांची वाहनांसह तपासणी केली. यावेळी त्यांचा जवळ २३.४६ ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर किंमत १ लाख ४० हजार ७६० रूपये मिळून आला. अमली पदार्थ जप्त करून पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३४ बी. व्ही. ४४४७ ताब्यात घेतले. वाहनाची किंमत ८ लाख असा एकुण ९ लाख ४० हजार ७६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मालु उर्फ नसीब आरीफ खान (वय २८ रा. बगल खिडकी चंद्रपुर), दिपक अशोकराव आसवानी (वय ३२, रा. सिंधी काॅलनी रामनगर चौक चंद्रपुर), जमीर शाबीर शेख (वय २२, रा. बगलखिडकी चंद्रपुर) यांना अटक करून त्यांचाविरूद्ध कलम ८ (क), २१ (ब), एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीसांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे संगितले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि, दिपक काँक्रेडवार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि. सुनिल गौरकार, सफौ. धनराज करकाडे, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा. दिपक डोंगरे, पोशि. प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, अमोल सावे, शशांक बदामवार, चापोहवा. दिनेश आराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे. "आपल्या आजुबाजुच्या परिसरात कोणताही इसम अंमली पदार्थाची विक्री अथवा सेवन करीत असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपुर तसेच डायल ११२ वर संपर्क करावा. आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधिक्षक,चंद्रपुर यांचेकडून चंद्रपुर येथील जनतेला करण्यात येत आहे." असे आवाहन महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)